
*बार्टीकडून उमाजी नाईक मरावे परी क्रांतीरुपे उरावे उक्तीशी तंतोतंत जुळणाऱ्या आद्य क्रांतिकारकाची जंयती मोठा उत्साहात साजरी*
वसमत: डॉ.बाबासाहेब आंबेडक
*बार्टीकडून उमाजी नाईक मरावे परी क्रांतीरुपे उरावे उक्तीशी तंतोतंत जुळणाऱ्या आद्य क्रांतिकारकाची जंयती मोठा उत्साहात साजरी*
पत्रकार काशिनाथ नाटकर
वसमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे समतादूत मिलिंद आळणे, सर्वप्रथम उमाजी नाईक राजे यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तराव पाटील माणगावकर हे होते. प्रमुख पाहुणे व्यंकटेश पाटील .होते.भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
राजे उमाजी नाईक यांचा ७ सप्टेंबर १७९१ साली पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२०ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर मॉकिनटॉसम्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. व्यसनमुक्ती पर प्रचार प्रसार करण्यात आला.
यावेळी दत्तराव पाटील महागावकर, दशरथ साखरे, व्यंकटेश पाटील सदाजी मारकळ, प्रणव आळणे ,विशाल अग्रवाल,शुभम कदम, गुरुनाथ गाडेकर केशव गायकवाड आभार प्रदर्शन रजनीकांत कमळू केले .आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.