logo

दिव्यातील दातीवली तलाव येथे अनंत चतुर्दशीचे विसर्जन आनंदात संपन्न

दिवा- परंपरागत मूर्ती विसर्जन केल्या जाणाऱ्या दातीवली तलाव (घाट परिसरात) ठाणे महापालिकेकडून गणरायाच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. सर्वत्र विद्युत रोषणाई व अनुचित प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तसेच वेळोवेळी ड्रोन च्या माध्यतून सर्व हालचालिंवर दक्ष पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन होते.

अनंत चतुर्थीला ठा.म.पा क्षेत्रात ९८६१ तर दातीवली तलाव येथे रात्री १२ वाजेपर्यंत जवळपास ५१३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रिमझिम पावसातच पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी बाप्पाचा निरोप घेतला.

पालिका कर्मचारी, पोलीस प्रशासना सोबतच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर होणारी ट्रॅफिक तसेच विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यात मोलाचे सहकार्य पाहायला मिळाले.

यावेळीठाणे संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ.शर्मिला अजय म्हात्रे, ठाणे जिल्हा समन्वयक अजय म्हात्रे, ज्योती घाडीगावकर, सुनील सूर्यवंशी, सरोजिनी खत्री, प्रांजल लाड, नंदा चव्हाण, जयदीप विशे, भारती कांबळे, भाग्यश्री येवले, लक्ष्मी विशे, निलेश बोर्डे, भारती फडणीस, वंशिका डांबले, मनीषा बबनकर, ज्योती मापारी, रवींद्र पवार, शिवाजी कदम, शैलेश पाठवले, मनाली उगवे, दर्शना बेंडके, दूर्वा नेवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

103
4520 views