logo

✅ बेरूला झेंडा प्रकरण "गाव सोडून हिंगोलीच्या दिशेने निघाले भीमअनुयायी... पायी लॉंगमार्च... औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूला गाव गेली दोन वर्ष येते चौक व

✅ बेरूला झेंडा प्रकरण "गाव सोडून हिंगोलीच्या दिशेने निघाले भीमअनुयायी... पायी लॉंगमार्च..
पत्रकार काशिनाथ नाटकर

औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूला गाव गेली दोन वर्ष येते चौक व निळा झेंडा उभा होता. अचानक हा झेंडा काढण्यात आला, झेंडा काढतांना शेकडो पोलीसांचा बंदोबस्त आणून बळजबरी केली.

महिलांना पुरुषांना गाड्यात भरलं अतिशय दहशत निर्माण करून झेंडा काढला. अनेकवेळा निवेदन दिले, प्रशासनाला आमच्या चौकाची अधिकृत नोंद करा म्हणून आवाहन केलं.

शेवटी न्यायचं मिळतं नाही म्हटल्यावर बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन भीमानुयायी महिला, विधार्थी, समता सैनिक दलाच्या महिला, भीमसैनिक पायी गाव सोडून हिंगोलीच्या दिशेने निघालेत.

किती लॉंग मार्च आमच्या नशिबी आहेत. काल दिवसभर पायी चालून रात्री मुक्काम केला. प्रशासन दखल घेत नाही, त्यांच्या आरोग्याचं चेकअप केलं जातं नाही, पोलीस संरक्षण लॉंगमार्च ला नाही.

बौद्ध समाजाचे मतं सगळ्यांना लागतात पण समाज संकटात आला कि कुणी लोकप्रतिनिधी सुद्धा डोकावून पाहत नाही.

आजची आज जिल्हा अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घ्यावी आणि त्यांच्या निळ्या झेंड्याच्या चौकाची अधिकृत नोंद करावी.

लॉंग मार्च दरम्यान कुणाला काही झाल्यास सर्वस्वी राज्य सरकार हिंगोली प्रशासन जबाबदार राहिल!

ऑल इंडिया पँथर सेना आंदोलकांच्या संपर्कात आहे.

1
329 views