
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
31 ऑगस्टला PSI अश्विनी केदारी मॅडमला दुखापत झालेली बातमी कळली आणि त्याच दिवशी त्यांचा भाऊ प्रितम केदारी यांना फोन करून अश्विनी मॅडमची तब्बेत कशी आहे हे विचारलं होतं आणि त्यावेळी तब्बेत चांगली असून डॉक्टरांनीही अश्विनी व्यवस्थित होईल असं सांगितल्याचं त्यांनी मला फोनवरून सांगितलं...
त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की पुढच्या 5-6 महिन्यात अश्विनी मॅडम बऱ्या होऊन नक्की ट्रेनिंगला जातील पण अचानक आज त्यांच्या निधनाची बातमी येणं हे भयंकर सुन्न करणारं आहे..महाराष्ट्रात PSI म्हणून पहिली आलेली ही मुलगी अचानक निघून जावी हे फार त्रासदायक आहे..विषय असा होता की अंघोळीसाठी गरम पाणी हवं असल्याने बादलीमध्ये हिटर लावला होता तेव्हा अचानक त्यांना झोप लागली आणि 3-4 तासांनी जाग आली त्यावेळी पाणी खूप गरम झालं होतं त्यामुळे त्याही थोड्या घाबरल्या होत्या. हिटर बंद करून बादली उचलताना पाणी सांडलं आणि त्याही पाय घसरून पडल्या त्यामुळे जवळपास 80 टक्के शरीर भाजलं होतं...या सगळ्याशी लढताना त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली...ही घटना मन हेलावणारी आहे आज इतकंच कळतंय मला...अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने जिवापेक्षा काही मोठं नाही हे लक्षात ठेवा.. घर-दार सोडून आपण शहराच्या ठिकाणी अभ्यास करत असतो आणि तिथं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं स्वतःलाचं बघावं लागतं परंतु अभ्यासाच्या नादात आपण बऱ्याच छोटया-छोटया गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अशा गोष्टीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं हे आपण विसरून जातो...सगळं करा पण स्वतःला सांभाळून...तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहात हे विसरता कामा नये त्यामुळे 2-4 गोष्टी कमी झाल्या तरी चालतील पण अभ्यास करत असताना स्वतःच्या तब्बेतीची मनापासून काळजी घ्या..हात जोडून विनंती आहे.