logo

लोकमत अमरावती सन्मान योजना 2025 : राहुल ठाकरे यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानित....



अमरावती :(अचलपूर )विवेक कडू
लोकमत अमरावती सन्मान योजना 2025 अंतर्गत शहरातील प्रगतीशील व यशस्वी उद्योजकांना गौरविण्यात आले. यामध्ये राहुल ठाकरे बिल्डर्स तसेच सावळी दातुरा ग्राम पंचायतचे पोलिस पाटील राहुल ठाकरे यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले.

राहुल ठाकरे यांनी बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यावसायिक प्रामाणिकपणा, गुणवत्तापूर्ण बांधकाम व सामाजिक भान यामुळे त्यांची कामगिरी विशेष ठरली आहे. ग्रामविकास व रोजगार निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल बोलताना राहुल ठाकरे यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्या कामाचा आणि समाजाशी असलेल्या नात्याचा गौरव आहे. पुढेही गुणवत्ता, पारदर्शकता आणि समाजसेवा हेच माझे उद्दिष्ट राहील.”

या सन्मानामुळे अमरावती जिल्ह्यातील उद्योजक व तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.



4
720 views