logo

जिल्हास्तरीय वजन उचलणे स्पर्धेत श्रीपूरची ऋतुजा जाधव ने प्रथम क्रमांक पटकावला



श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या ऋतुजा शहाजी जाधव या विद्यार्थीनीने जिल्हास्तर वजन उचलणे या स्पर्धेत आज अकलूज येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे ऋतुजा जाधव हिने एकुण वजन 125किलो वजन उचलून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला पुणे येथे राजगुरुनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे ऋतुजा जाधव हिच्या दैदिप्यमान यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक व संस्थेचे अध्यक्ष डॉ रामदास देशमुख उपाध्यक्षा सौ शुभांगीताई देशमुख सचिव भारत कारंडे सदस्य यशराज देशमुख प्राचार्य श्री पां बा बनसोडे सर उपप्राचार्य श्री गवळी सर पर्यवेक्षक श्री गुरव सर संस्था मान्य पर्यवेक्षक श्री शेंडे सर ऋतुजा जाधव हिला मार्गदर्शन करणारे श्री धाराव सर शेख सर सर्व क्रिडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

9
95 views