logo

*जव्हारहून राज्यव्यापी ठिणगी; ‘जनसुरक्षा कायदा’विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर*




*जव्हार प्रतिनिधी :-


राज्य सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला बंधन घालण्यासाठी इंग्रजांच्या गुलामीचा "जनसुरक्षा कायदा" जसाच्या तसा कॉपी-पेस्ट करून लागू करण्याचा घाट घातला आहे, असा सणसणीत आरोप करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हारमधून राज्यव्यापी निषेधाची ठिणगी पडली आहे. केंद्र व राज्य सरकारने आणलेल्या तथाकथित ‘जनसुरक्षा कायदा’ विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून आपला ठाम विरोध नोंदवला. जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांचे हक्क, आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीची कास हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जव्हार तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या निदर्शनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या आघाडीच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनातून सरकारला इशारा देण्यात आला की, हा कायदा मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन पेटवले जाईल.

राजकीय जाणकारांच्या मते, आदिवासी भागातून सुरू झालेली ही चळवळ ग्रामीण ते शहरी पट्ट्यांत वेगाने पसरू शकते. महाविकास आघाडीने जनतेच्या असंतोषाला राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे संकेत यातून मिळतात. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

जव्हारमधील या आंदोलनाने सरकारच्या अंगावर शहारे आणले आहेत. लोकशाहीचे गळचेपी करून ‘जनसुरक्षा’च्या नावाखाली जनतेवर दडपशाही लादायची? मग तयार राहा महाराष्ट्रातील जनता झुकणार नाही, झुंजार लढणार! महाविकास आघाडीने दिलेला हा झंझावाती चपराक म्हणजे फक्त सुरुवात आहे; पुढे राज्यभर ‘ठिणगी’ ज्वालामुखी होणार आणि सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या हादरवणार!

यावेळी माजी आमदार सुनिल भाऊ भुसारा, राष्ट्रीय काँग्रेस आदिवासी आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष बळवंत गावीत, तालुका अध्यक्ष संपत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप माळी, शिवसेना नेते हर्षद कोतवाल, कष्टकरी संघटनाचे नेते अजय भोईर, माजी नागराध्यक्ष जव्हार नगरपरिषद रियाज भाई मणियार विक्रमगड विधानसभा अध्यक्ष दादा शेट तेंडुलकर, युवा नेते लालूशेट, युवा नेतृत्व विनू दादा मौळे,मनीषा ताई वाणी, विध्यार्थीसेना अध्यक्ष राहुल घेगड, रुईघर चे सरपंच अतुल घाटाळ, चेतन कव्हा, जगदीश जंगली, अमित डोके, शाम जाधव, महाविकास आघाडी जव्हार मधील सरपंच, उपसरपंच, माजी नागसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नागराध्यक्ष तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

3
220 views