logo

फुक्किमेटा गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी रामेश्वरजी बहेकार यांची बिनविरोध निवड

देवरी तालुक्यातील फुक्किमेटा ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी रामेश्वरजी बहेकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत फुक्किमेटा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी गुरुवार दि.11सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
सरपंचा सुलोचना सरोते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत अध्यक्ष पदाच्या नावावर एक मत झाले. या सभेत गावातील नागरिक रामेश्वरजी बहेकार यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड होताच उपस्थित ग्रामस्थांनी नवीन अध्यक्ष रामेश्वरजी बहेकार यांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजेच रामेश्वरजी बहेकार हे पंचायत समितीचे मा.सदस्य राहिलेले कार्य पुरुष आहेत. यांच्या योग्य निर्णयाने गावातील जनतेला योग्य ते न्याय मिळेल ह्या विचाराने ग्रामस्थानी खरा निर्णय घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष पदी रामेश्वरजी बहेकार यांची बिनविरोध निवड केली.
या वेळी उपस्थित.
सरपंच सुलोचना सरोते,चिंतामणी गंगाभोईर उपसरपंच, एस.पी. गायकवाड सचिव,सर्व सदस्य गण,कन्हैया क्षीरसागर पत्रकार, व गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक सभेला उपस्थित होते.

5
257 views