logo

संतोष एकनाथ गुरव यांची "गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठान महाराष्ट्र" चे नवे कोषाध्यक्ष म्हणून निवड समाजासाठी निस्वार्थ सेवेला मिळाले योग्य व्यासपीठ

नाशिक येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवार रोजी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानची तिमाही सभा संस्थेचे विश्वस्त संजय महादू गुरव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली या सभेमध्ये गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त संतोष एकनाथ गुरव यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
समाजसेवा आणि निस्वार्थी कार्याची खरी दखल घेत गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या तिमाही सभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.या सभेत गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या आणि विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या संतोष एकनाथ गुरव (म्हसावद) यांची गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
सामाजिक कार्याबरोबरच संस्थेच्या कार्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाने आपली भूमिका बजावणाऱ्या संतोष गुरव यांच्या निवडीचे उपस्थित पदाधिकारी व विश्वस्तांनी मनःपूर्वक स्वागत केले.
प्रामाणिकपणा,चिकाटी आणि सेवाभाव या गुणांमुळे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संतोष गुरव यांचे योगदान अद्वितीय आहे.त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य देत निस्वार्थपणे काम केले आहे.त्यांच्या या निवडीमुळे समाजकार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल,असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
नव्या जबाबदारीबद्दल बोलताना संतोष गुरव यांनी सांगितले की, “माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. संस्थेच्या कार्याचा विस्तार, समाजातील तरुणांना प्रेरणा आणि एकसंघतेच्या माध्यमातून प्रगती हेच माझे ध्येय राहील.”
गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठान महाराष्ट्रचे विश्वस्त,पदाधिकारी तसेच सर्व समाजबांधवांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. .
सदर कोषाध्यक्ष पदाची निवड करण्याक्षणी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर देवरे,उपाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, सचिव संजय गुरव,कोषाध्यक्ष संतोष गुरव,सहसचिव भूषण गुरव,विश्वस्त संजय गुरव,सुनील गुरव,रवींद् गुरव सतीश कुवर व भावेश गुरव आदी उपस्थित होते.

24
784 views