logo

साकेगाव येथील गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त रवींद्र ओंकार गुरव यांचा समाजसेवेच्या उज्ज्वल कार्याचा गौरव

नाशिक येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवार रोजी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानची तिमाही सभा संस्थेचे विश्वस्त संजय महादू गुरव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली या सभेमध्ये गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त रवींद्र ओंकार गुरव यांचा गौरव करण्यात आला.
समाजकारण,शिक्षणक्षेत्र आणि नि:स्वार्थ सेवेच्या माध्यमातून आयुष्य घडविणारा एक भक्कम स्तंभ म्हणजे गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त रवींद्र ओंकार गुरव.संस्थेच्या स्थापनेपासून सातत्याने त्यांनी दिलेले योगदान हे केवळ समाजासाठीच नव्हे तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.या महान कार्यकर्त्याचा गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानतर्फे सन्मान चिन्ह देऊन अभिमानपूर्वक गौरव करण्यात आला.
त्यांच्या कार्याचा उजळलेला इतिहास सांगतो की –अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करून शिक्षणाला सन्मान दिला,गुणी व कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांच्या स्वप्नांना नवे पंख दिले,शिक्षणात यशस्वी होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना योग्य दिशा दिली,गुरव समाजातील विविध संस्थांना आर्थिक योगदान देऊन समाजसेवेची खरी प्रचिती घडवली,भुसावळ येथे प्रतिष्ठानची तिमाही सभा यशस्वीपणे आयोजित करून समाजहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घडवून आणले.
रवींद्र गुरव यांचे व्यक्तिमत्त्व अनुभवाने परिपूर्ण,ध्येयाने प्रेरित व सेवाभावी आहे."अनुभव हा माणसाचा सर्वोत्तम गुरु असतो" हे त्यांच्या जीवनातून साकार झाल्याचे समाज अनुभवत आहे.त्यामुळेच गुरव समाज व ज्ञानगंगा प्रतिष्ठान त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगते.
प्रेरणा,समर्पण आणि नि:स्वार्थ भावनेचा संगम म्हणजेच बापूसाहेब रवींद्र ओंकार गुरव.समाजाचा विकास,विद्यार्थ्यांचा प्रगतीमार्ग आणि भुसावल विभागात गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानची उंचावलेली प्रतिमा हे त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे.
संस्थेतर्फे सर्व पदाधिकारी व विश्वस्त मंडळींनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत सन्मान सोहळा मोठ्या आदराने आयोजित केला.त्यांच्या या अमूल्य सहकार्याचा वारसा संस्थेला सतत लाभत राहावा, त्यांच्या कार्याचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचावा हीच सर्वांची इच्छा आहे.रवींद्र ओंकार गुरव यांना यापुढच्या आयुष्यात उत्तरोत्तर यश लाभो, समाजहिताच्या मार्गावर त्यांचे योगदान अधिकाधिक वाढो व त्यांच्या सेवामय कार्याची गाथा पिढ्यानपिढ्या प्रेरणा ठरो.हा संपूर्ण गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठान व समाजाचा शुभेच्छा संदेश आहे.
सदर गौरव करण्याक्षणी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर देवरे,उपाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, सचिव संजय गुरव,कोषाध्यक्ष संतोष गुरव,सहसचिव भूषण गुरव,विश्वस्त संजय गुरव,सुनील गुरव,रवींद् गुरव सतीश कुवर व भावेश गुरव आदी उपस्थित होते.

18
1841 views