logo

*नांगरमोडा-पिंपळगाव येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा*


जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नांगरमोडा/पिंपळगाव येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले, यात पोलीस टीम (उपनिरीक्षक गोंड, कॉन्स्टेबल बेहेरे आणि कॉन्स्टेबल श्रीमती भांगरे), माजी सभापती सुरेश कोरडा साहेब, उपसरपंच नरेश पढेर साहेब, ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम कोरडा आणि मुख्याध्यापक महेश भोये यांच्यासह BAIF/ पॅनासोनिक टीमने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व BAIF/पॅनासोनिक टिमने गावभर रॅली काढून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणारे घोषवाक्ये दिली. यामध्ये समाजात शिक्षणाचा प्रभाव आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांसाठी.

जव्हार पोलीस टीमने जन संवाद अभियान अंतर्गत POSCO Act 2012 आणि चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या विषयी माहिती सत्र आयोजित केले. या सत्रात विद्यार्थ्यांना स्वतःचे हक्क, सुरक्षितता आणि गैरवर्तनापासून बचावाचे उपाय समजावून सांगितले गेले.

शिवाय, पॅनासोनिक टीम, पोलीस टीम, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा झाली, ज्यात सामाजिक समस्या, गुन्हे प्रतिबंधन आणि आदिवासी क्षेत्रातील विकासाच्या अडचणींवर विचार मंथन करण्यात आले. जव्हार पोलीस टीमने युवक आणि किशोरवयीन मुलांसाठी भविष्यातील सहकार्याची हमी दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देण्यासाठी साक्षरता दिन विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, ज्यात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व रंगविले.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत पॅनासोनिक टीमने प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश स्पीकिंग बुकचे वाटप केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेतील ज्ञान/कौशल्य वाढण्यास मदत होईल.

कार्यक्रमाचा समारोप धन्यवाद प्रस्तावनेने करण्यात आला व राजेश कोतकर (पॅनासोनिक प्रकल्प प्रमुख) त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.

10
55 views