logo

तालुका स्तरीय शालेय स्पर्धेत पुन्हा एकदा माध्यमिक आश्रम शाळा नाईकनगर धसवाडी चा बोलबाला!

अहमदपूर- तालुकास्तरीय ४०० रीले स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुले १.पवार करण २.आडे योगेश ३.राठोड प्रदीप ४.जाधव सुमीत ५.खरात महेश वरील सर्व प्रथम आले असून जिल्हा स्पर्धेसाठी पात्र झाली आहेत.
भाला फेक स्पर्धेत १७ वर्षे मुले राठोड प्रदीप प्रथम तर आडे योगेश तृतीय आले असून दोघांची पण जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हातोडा फेक स्पर्धेत
डोंगरे बालाजी प्रथम व डोंगरे विश्वनाथ तृतीय क्रमांक पटकावला असून दोघांची पण जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हर्डल्स स्पर्धेत १४ वर्षे वयोगट
करे प्रतीक प्रथम आला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हर्डल्स ११० मीटर राठोड प्रदीप प्रथम व सुर्यवंशी ओम द्वितीय क्रमांक आला असून दोघांची पण जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हर्डल्स ४०० मीटर
करण पवार प्रथम व राठोड प्रदीप द्वितीय क्रमांक पटकावला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी दोघेही पात्र झाली आहेत.थाळी फेक स्पर्धेत सहभागी झालेला डोंगरे बालाजी हा सर्वप्रथम आला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत "एकलव्य मागास सेवा समिती, मानखेडचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष,शिक्षणमहर्षी आदरणीय श्री.शिवाजीराव विठ्ठलराव भिकाने ,संस्थेचे सचिव श्री. सचिनराव शिवाजीराव भिकाने , कोषाध्यक्षा तथा मा.जिल्हापरिषद सदस्या सौ. मुद्रिकाताई शिवाजीराव भिकाने मॅडम,सहसचिव डॉ. श्री.शशिकिरण उत्तमराव भिकाने साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री.बालाजीराव झाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

4
42 views