logo

एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघ तर्फे पहिल्या मेळाव्यात साठ सोसायटी सहभागी. PMC आरोग्य विभागच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन.

शिवणे:सविस्तर एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघ  तर्फे गणेश उत्सव निमित्त भरविण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण व सोसायटी समस्या,निवारण व मार्गदर्शन असा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाला साधारण साठ सोसायटीनी सहभाग नोंदवला.या सोसायटी मधील चेअरमन, सचिव व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
.        कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड श्री गजानन रहाटे उपस्थित होते. यनिमित्त प्रश्न उत्तराचा सेगमेंट झाला सोसायटी मधील अडचणी जसे की सोसायटी रजिस्टर प्रोसेस, कनव्हेन्स डिड, कमिटी चे कार्य, मेन्टेनन्स बद्दल सोसायटी कमिटीचे अधिकार या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले. व लोकांच्या अडी अडचणी साठी सोसायटी महासंघ मोठे काम करीत आहे व भविष्यात या निमित्त अनेक कामे करतील असे उदगार प्रमुख पाहुणे यांनी काढले.
. या कार्यक्रमला पुणे महानगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यासाठी कोथरूड-वारजे विभागीय कार्यालयातून वरिष्ठत आरोग्य निरीक्षक श्री नितीन लोखंडे, आरोग्य अधिकारी श्री सचिन सावंत, श्री राजेंद्र वैराट व सौं कौशल पटेल उपस्थित होते. कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व सोसायटी मधील समस्या यावरती महत्वाचे मार्गदर्शन श्री नितीन लोखंडे व श्री सचिन सावंत यांनी केले.येणाऱ्या काळात सोसायटी महासंघ व प्रशासन मिळून काम करू असे उदगार या प्रसंगी काढण्यात आले.
. महासंघांचे अध्यक्ष श्री नवनाथ नलवडे काही करणाने येऊ शकले नाहीत त्यांच्या वतीने सभेचे अध्यक्ष स्थान महासंघांचे कार्याध्यक्ष श्री सुनील वरघुडे यांनी भूषविले आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की सोसायटी महासंघ परिसरातील सोसायटी चे मूलभूत प्रश्न सोडण्यासाठी नेहमी कार्यरत असेल सोसायटीनां लीगल व योग्य मार्गदर्शन करणे महासंघांचे प्रथम कर्तव्य असेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री प्रवीण लांडगे यांनी केले तर महासंघांचे खाजानीस श्री प्रशांत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमला विष्णू पुरम सोसायटीने हॉल देण्याचे काम केले त्या निमित्त विष्णू पुरम सोसायटीचे (कॉमन)अध्यक्ष श्री महेश भांदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मान्यवरांनां शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला सोसायटी सदस्य श्री गंगाधर कुऱ्हाडे, श्री. धनंजय दंडवते, श्री तुलसीदास नांदगावकर, श्री संतोष घारे, श्री सतीश पटवारी, श्री संग्रामसिंहं भोसले यांनी नियोजन व सहकार्य केले.श्री महेश भांदेकर यांच्या "सायबा" आमृतुल्य यांनी चहा व पाण्याचे नियोजन केले.श्री संग्रामसिंहं भोसले यांनी सर्टिफिकेट डिझायन व छपाई ची जबाबदारी पार पडली.
. या कार्यक्रमात गौरी गणपती सजावट 2025 स्पर्धेचे विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.गौरी गणपती सजावट प्रथम क्र. वर्षा पासलकर-ढमढेरे,द्वितीय क्र.प्रशांत माने,त्रितीय क्र.सुवर्णा पुजारी,चौथा क्र.नरेंद्र जगताप,पाचवा क्र.प्रिती पाटील,सहावा क्र.प्रियांका धावडे,सातवा क्र.धनंजय जावळकर,आठवा क्र राजेश धावरे,नऊ क्र पौर्णिमा नलगुडे,दहावा क्र.संग्राम भोसले या देण्यात आले परिसरातील एकूण 30 स्पर्धेकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

58
1392 views