logo

मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना दोन लाख लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मोताळा तालुयातील ग्राम थड येथील शेतकर्‍याची जमीन भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी आणि विक्री करण्याची परवानगी मिळण्यासाठी मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी प्रति एकर पन्नास हजार रुपये प्रमाणे दोन लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार हेमंत पाटील यांच्या घरी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हेमंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदाराचे मामा यांचे ग्राम थड येथील गट नंबर २३ मधील ०१.६२ असल्याबाबत नोंदणीकृत सौदेपत्रक करून दिलेले आहे. जमीन ही भोगवटादार वर्ग-२ मधुन वर्ग-१ करण्याकरीता तक्रारदाराचे मामा यांनी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, मोताळा जि. बुलढाणा यांना आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला आहे. तक्रारदाराचे मामा अशिक्षीत असल्यामुळे शेतजमीन भोगवटादार वर्ग-२ मधुन वर्ग-१ मध्ये करण्यासंबंधाने तक्रारदार हे तहसिलदार हेमंत पाटील यांना भेटले असता त्यांनी सदर जमीनीचे भोगवटादार वर्ग-२ मधुन वर्ग-१ मध्ये करण्याकरीता प्रति एक्कर रू. ५०, हजार याप्रमाणे एकुण ४ एक्कराचे रू. २ लाख रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदारास तहसिलदार हेमंत पाटील यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी आरोपी हेमंत पाटील यांचेविरूध्द कारवाई करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे दि. ३ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली.

आरोपी यांचे Hemant Patil bribery case राहते घर रामलक्ष्मी नगर, गायकवाड ले-आऊट बुलढाणा येथे लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी हेमंत पाटील यांनी सदरची शेतजमीन भोगवटादार वर्ग-२ मधुन वर्ग-१ मध्ये करण्याकरीता तक्रारदाराकडे पंचासमक्ष रू. ५० हजार प्रति एक्कर प्रमाणे एकुण ४ एकराचे रू. २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर दि. १४ सप्टेंबर रोजी आरोपी यांचे राहते घर रामलक्ष्मी नगर, गायकवाड ले-आऊट बुलढाणा ता. जि. बुलढाणा येथे रचण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाही दरम्यान आरोपी हेमंत पाटील यांनी तक्रारदाराकडे मागणी केलेली लाच रक्कम रू. २ २ लाख पंचासमक्ष स्विकारली. त्यानंतर आरोपीस संशय आल्याने आरोपीने सदरची लाच रक्कम त्याचे राहते घराच्या शौचालयामध्ये टाकून दिले व लाच रक्कम (पुरावा) नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २ लाख दोन्ही पंचासमक्ष जप्त करण्यात आली. त्यावरून नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन बुलढाणा (शहर) जि. बुलढाणा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाही पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला मिलिंदकुमार बहाकर, यांचे मार्गदर्शनात सापळा अधिकारी अतुल इंगोले, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदिप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार, पोहवा अर्चना घोडेस्वार, चालक नफिस सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांनी पार पाडली.

13
417 views