logo

महापुरुषांच्या शिकवणीवर – जन सत्याग्रह संघटनेला अभिनव उपक्रमाची संकल्पना साकारण्यात यश

शकील खान /अकोला :– शहरातील कपडा बाजार चौकात जन सत्याग्रह संघटनेतर्फे एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. समाजात वाढत चाललेल्या धार्मिक द्वेष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने लोकांना दूध पाजून मानवता, बंधुता आणि ऐक्याचा संदेश दिला.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत टीपू सुल्तान यांच्या शिकवणीचा गौरव करण्यात आला. या महामानवांची खरी विचारधारा म्हणजे “भुकेल्याला अन्न, तहानल्याला पाणी आणि नागव्या माणसाला वस्त्र” हे असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला –
“छत्रपती शिवाजी महाराज की जय!”
“बाबासाहेब आंबेडकर की जय!”
“हजरत टीपू सुल्तान की जय!”
या वेळी संघटनेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान, तसेच अब्दुल वाहिद, मोहम्मद उमर फारुख, आबिद शाह, शेख आसिफ, सय्यद जाहिर, साहिल रिजवी, मोहम्मद नोमान, शेख महबूब, मोहसिन खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून महापुरुषांच्या विचारसरणीला अनुसरून समाजात ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्याचा निर्धार केला.
संघटनेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान म्हणाले –“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत टीपू सुल्तान यांचे आयुष्य हे इंसाफ, समानता आणि मानवतेसाठीचे प्रतीक आहे. आज दूध पाजून आम्ही दाखवून दिले की खरी धर्मशिक्षा म्हणजे भुकेल्याला जेवू घालणे, तहानल्याला पाणी पाजणे आणि माणसामाणसांमध्ये बंधुता निर्माण करणे होय. हा उपक्रम म्हणजे द्वेष पसरवणाऱ्यांना करारा उत्तर असून जन सत्याग्रह संघटना नेहमी ऐक्य आणि बंधुत्वाची मशाल पेटवत राहील.

45
1236 views