logo

रिक्त ३ लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज शासकीय कार्यालयांतील अ ते क गटापर्यंतची पदे रिक्त कधी भरणार?

तुमसर : राज्यात सर्वच शासकीय कार्यालयांतील गट 'अ' ते 'क' पर्यंतची जवळपास तीन लाख पदे रिक्त आहेत. परिणामी सर्वच शासकीय यंत्रणांवर कामाचा ताण येत आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तेव्हा आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध संवर्गातील रिक्त पदे भरली जावीत, जेणेकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार मिळेल आणि अधिकाऱ्यांवरील कामाचा भार देखील हलका होईल. यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून निकाल लागेपर्यंत अनेक महिन्यांचा कालावधी जातो. काही विभागाच्या परीक्षांची प्रक्रिया चालूच असते. अशात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपते. म्हणून वेळेत परीक्षा होणे अपेक्षित आहे.

... तर तयारी करणाऱ्यांना मिळेल दिलासा

वेळेत परीक्षा झाल्यास निकाल लागून नियुक्ती मिळाली तर ते नोकर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सोयीची ठरेल. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी विविध पदांच्या जाहिराती निघाल्या तर नोकर भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल, तसे नियोजन आवश्यक आहे.

सरळसेवा भरती प्रक्रिया जाहिराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्याआधी घ्याव्यात. सामाजिक न्याय विभाग, नगरपरिषद / नगरपंचायत गट 'क' व 'ड', पोलिस भरती, वित्त व लेखा कोषागार विभाग, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, नागपूर, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका, चार कृषी विद्यापीठे, महाराष्ट्र वखार महामंडळ, महाबीज महामंडळ, सार्वजनिक आरोग्य भरती गट 'क', 'ड', वन भरती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती प्रक्रिया पूर्ण केल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. यातील काही महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध झाली.

23
2275 views