logo

छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करा सर्व जनतेला आव्हान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद ग्रामसभेत व्यक्त केले.

बालाजी पडोळे ( विशेष प्रतिनिधी) .आज शिरूर ताजबंद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब जी पाटील तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थित राहून शूरविरांच्या स्मृतीस अभिवादन केले. या प्रसंगी वीर सैनिकांच्या बलिदानाला मानाचा मुजरा केला व
या ऐतिहासिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा परिषद लातूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकास्तरीय कार्यशाळा अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर व अभियानाचे 7 घटक व ग्रामपंचायती साठी बहुस्तरीय पुरस्कार योजना याविषयी माहिती देण्यात आली . व कार्यक्रमास उपस्थित अधिकारी उपविभागीय अधिकारी, मंजुषा लटपटे, तहसीलदार ,उज्वला पांगरकर, गट विकास अधिकारी ,पंकज शेळके ,पोलीस निरीक्षक घुसनूर , माजी कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज भैय्या पाटील , ग्राम विकास अधिकारी प्रशांत घुगे ,पोलीस पाटील उत्तम वाघमारे, गटशिक्षण आधिकारी धोकाडे, प्रकल्प अधिकारी शोभा घोडके , सोसायटी चेअरमन तुळशीराम भोसले, तलाठी गणेश इंगोले, महावितरण अधिकारी गुजराती, आधी सह राजकीय नेते पदाधिकारी लोकसेवक कार्यकर्ते व्यापारी संघटना व ग्रामपंचायत सर्व सदस्य व सोसायटी सर्व सदस्य, प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया

144
2278 views