logo

थेपडे विद्यालय म्हसावद येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न

म्हसावद ता. जि. जळगाव येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. डी. चौधरी सर, उपमुख्याध्यापक श्री जी. डी. बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री के. पी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत 103 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर चित्रकला स्पर्धेत 75 विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेसाठी श्री पी. पी. मगरे सर व चित्रकला स्पर्धेसाठी कलाशिक्षक श्री डी एम सोनवणे सर यांनी स्पर्धा संपन्नतेसाठी विशेष सहकार्य केले. दोन्ही स्पर्धांमधील गटाप्रमाणे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठविले जाणार आहेत.

27
913 views