logo

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तांडा येथे काही दिवसांपूर्वी १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अतिशय अमानुष आणि दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे आज त

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तांडा येथे काही दिवसांपूर्वी १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अतिशय अमानुष आणि दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे आज त्या ठिकाणी भेट देऊन संबंधित कुटुंबियांशी आपुलकीने संवाद साधून धीर दिला. तसेच दोषी नराधमावर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक ते सर्व करीन तसेच या संकटाच्या काळात मी आपल्यासोबत आहे, अशी ग्वाही दिली.

शाळकरी वयाच्या चिमुकल्या लेकरावर अशी वेळ येणे, हे अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे या घटनेबद्दल सर्व समाजमन अतिशय व्यथित झाले आहे. झालेला अमानुष अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार असून त्याविषयी संपूर्ण समाजात तीव्र संताप आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी बोलून तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. शिवाय, समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून माणुसकी जपावी, असेही उपस्थितांना आवाहन केले.

5
186 views