
देवमाळी ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा सम्पन्न.
( देवमाळी ग्रामपंचायत आता नगर परिषद मध्ये समाविष्ठ होणार नाही )
अचलपूर ( विवेक कडू :- पत्रकार )
आज दिनांक 16/09/2025 ला देवमाळी ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली ग्रामसभा सुचिवर विषय खालील प्रमाणे 1) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चर्चा करुन सुरवात करण्याबाबत 2)पांदन रस्तेविषयक मोहीम अंतर्गत चर्चा करुन ग्राम स्तरावर रस्त्याची यादी करुन मान्यता घेण्याबाबत 3)अतिक्रमण नियमाकुल सबंध्दाने निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण प्रस्तबाबत चर्च्या करणे 4)राष्टमाता राजमाता जिजाऊ मा. साहेब सांस्कृतिक भवन बांधकाम करता जागेची निवड करणे बाबत. 6)प्राप्त अर्ज नुसार देवमाळी ग्रामपंचायत नगर परिषद mमध्ये समाविष्ठ करण्याबाबत या विषय वर ग्रामसभेत जास्त भर देण्यात आला ग्रामस्थांनी अर्ज करणाऱ्या व्यक्तींची नावे विचारली असता सतीश शर्मा व भाजप तालुका अध्यक्ष मालखेडे व इतर चार सर्वांची नावे सांगण्यात आली 6 वर चर्च्या करण्यात आलि हा विषय सभेत आला कसा या बाबत विचारणा झाली सर्व ग्रामस्थांनी या विषयला कदतीव्र विरोध केला. आलेला अर्ज फेटाळून लावण्याची मागणी झाली आमची देवमाळी कायम नगर परिषद मध्ये समाविष्ठ करू नये असा ठराव सर्वानुमते पारीत झाला. ग्रामपंचायत सभेत सहभागी श्री विवेक कडू मा. दिवाकरराव किटुकले, शिवा बुंदीले, गिरीश भोयर, माजी सरपंच गौरी काशीकर माजी उपसरपंच संदीप काळे, राजूभाऊ मुंदे ऋषीं बारबदे, गोलू कैथवास, रवी वानखडे, नागेश्वर सोळंके, अजय जवंजाळ महिला सौ. मंदाकिनी जवंजाळ, माकोडे, कल्पना पेढेकर, उईके मॅडम आदी सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.