logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दौंड तालुका महसुल सेवा पंधरवडा" या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संपन्न .

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान अंतर्गत "दौंड तालुका महसुल सेवा पंधरवडा" या उपक्रमाचा शुभारंभ आज आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात महसूल सेवा पंधरवडा दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महसुल विभागाच्या सेवांची लोकाभिमुख अंमलबजावणी, नागरीकांच्या अर्जांचे वेळेत निपटारे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.यामध्ये प्रमाणपत्रे, नोंदी, शासकीय लाभ, तसेच इतर महसुल सेवा पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दौंड तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील गाव रस्ते, शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी बनविण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील प्राथमिक स्वरुपात एकूण १६ गावांचे GIS आधारित MAP अनावरण करण्यात आले. तसेच महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा, ५० भटक्या व विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले, १२५ संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना मंजूर लाभार्थी यांचे प्रमाणपत्र, १३४ भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमी केलेचे दाखले, २६ पुनर्वसन भूखंड वाटप दाखले, ३२ शिधापत्रिका वाटप, ४ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा वाटप आदी योजनांचे वाटप करण्यात आले. दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी आमदार श्री. राहुल कुल, प्रांताधिकारी श्री. रेवणनाथ लबडे, तहसीलदार श्री. अरुण शेलार, यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, गटविकास अधिकारी श्री. अरुण मरभळ, उप अधिक्षक भूमि अभिलेख श्री. धनराज शिंदे नायब तहसिलदार श्री. तुषार बोरकर, श्री. राजेश कानसकर, श्रीमती ममता भंडारे, तालुका कृषी अधिकारी श्री. अजिंक्य दुधाणे, याबरोबरच सर्व महसूल, कृषी कर्मचारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, महा ई सेवा केंद्र चालक व लाभार्थी उपस्थित होते.

93
2248 views

Comment