logo

ग्राम सभा - वीज कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर - कर्मचाऱ्यांची बोलती बंद

झालं असं - दिनांक १ ७ सप्टेंबर रोजी नाडण ग्रामपंचायत मध्ये झाली ग्रामसभा , त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली , त्यामध्ये एक विषय होता -वीज मीटर बदलण्या विषयी , त्याची माहिती देण्यासाठी आले होते वीज कर्मचारी आणि मीटर बदलण्याची ठेकेदारी घेतलेल्या कंपनीचा नोकर , कंपनीचा नोकर बोलायला लागल्यावर श्री मकरंद जोशी त्यांच्यावर भडकलेच , तुमचा या ग्रामसभेत येण्याचा काय संबंध ? तुम्ही इथे मीटर विक्रीसाठी एजंट म्हणून आलात, का ? तुमचा आमच्याशी काही संबंध नाही , असे थेट सांगितल्या नंतर एजंट गांगरला त्याला काय बोलावे समजेना , मग नाडण चे वायरमन बोलते झाले , पण बिचाऱ्या त्या वायरमन ना हि पूर्ण माहिती नाही , मीटर कशासाठी बदलायची याची संयुक्तिक कारणे देता आली नाहीत , मीटर फॉल्टी म्हणून बदलायची हे बरोबर पण मीटर फॉल्टी आहे हे तुम्ही कसे ठरलेत ,याचे संयुक्त्तीक उत्तर देता आले नाही वीजमंडळाला वाटते म्हणून बदलायची का , असे विचारल्यावर पुढे काय बोलावे वायरमनला सुचेना , खरंतर मंडळाच्या अधिकाऱ्याने सभेला येऊन माहिती देणे आवश्यक होते . शेवटी ग्रामस्थांनी एकजुटीने सरपंचांना सांगून टाकले कि जो पर्यंत ग्रामस्थांचे या विषयी समाधान होत नाही तो पर्यंत नाडण मधील कोणत्याही ग्राहकाचे मीटर वीजमंडळाने बदलायचे नाही असा ठराव करून टाका. त्यावर ग्रामसेवकाने मध्यस्ती करीत सांगितले असे नको आपण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवूया आणि मग ठरवू , यावर सर्व ग्रामस्थांनी सम्मती दिली आणि हा विषय तिथेच संपवण्यात आला.
---- Vinata Social Media

22
1871 views