
फुले ,शाहू , चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन शिक्षक युनियन महाराष्ट्र अध्यक्षपदी डी जी रंगारी यांची नियुक्ती.
फुले ,शाहू , चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन शिक्षक युनियन महाराष्ट्र (ठाणे ) मुंबई या सामाजिक संस्थेच्या शिक्षक युनियन महाराष्ट्र अध्यक्ष पदी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त शिक्षक डी. जी. रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.श्री.रंगारी यांनी शिक्षक पदावर ३३ वर्षे काम केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा संघटनेला व्हावा व संस्थेचे सामाजिक कार्यात मोलाचे योगदान मिळावे म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांचे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांना विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, ज्यात महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारा'चा समावेश आहे.त्यांच्या निवडीबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटना, साकोली सेंदुरवाफा बेरोजगार निवासी संघटना, महाराष्ट्र पत्रकार संघ, गुड मॉर्निंग ग्रुप व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच फुले ,शाहू ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहे.