
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची भव्य निदर्शने*
*लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची भव्य निदर्शने*
(जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा..संतोष नागरगोजे)
आज लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा व संपूर्ण कर्जमाफी करा या व तत्सम मागण्यांसाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली."ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा" "शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे""शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे" अश्या घोषणांनी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओला दुष्काळ जाहीर होण्यासोबत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी कारण लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 50 लाख पेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस,मुग, उडीद, तूर, भुईमूग, मका, ज्वारी, सर्व प्रकारचा भाजीपाला, तसेच सर्व फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही लोक मृत्युमुखी पडले आहेत तर गुरेढोरेही दगावली आहेत. तसेच पुरामुळे नदीकाठच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतीअवजारे, शेतीमालही पुरात वाहून गेला आहे. या सर्व नुकसानीपोटी शासन NDRF च्या निकशानुसार 30 मे 2025 च्या जीआर नुसार 2 हेक्टर च्या मर्यादेपर्यंतच मदत करणार आहे.त्यानुसार जिरायत शेतीपिकासाठी हेक्टरी 8500 रुपये मदत मिळणार आहे. बागायत शेतीपिकासाठी हेक्टरी 17000 रुपये तर बहुवार्षिक पिकासाठी (फळ पिकासाठी) हेक्टरी 22 हजार 500 रुपये मदत मिळणार आहे. परंतु ही मदत अतिशय तोकडी आहे. या मदतीमुळे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था शेतकऱ्यांची होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रचंड बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकवता त्यांना तात्काळ भरीव मदत मिळावी.जिरायत शेती पिकासाठी हेक्टरी 8500 रुपयाची मदत ही खूप तोकडी होते त्यासाठी हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करण्यात यावी.बागायत पिकासाठी हेक्टरी 1.5 लाख रुपयांची मदत करावी.बहुवार्षिक पिके (फळबागासाठी) प्रती हेक्टरी 2 लाख रुपयाची मदत करावी.मनुष्यहानीसाठी शासनातर्फे केली जाणारी 4 लाख रुपयांची मदत खूप कमी आहे त्यासाठी प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत करावी व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीवर घ्यावे.
म्हैस, बैल, गाय, घोडा या मृत गुराढोरासाठी प्रति जनावर 1 लाख रुपयांची मदत करावी.जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी 1 लाख रुपयांची मदत करावी.घराची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून तात्काळ पक्के घर बांधून देण्यात यावे व इतर नुकसानीसाठीही शासनाने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अश्या विविध शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने,शिवकुमार नगराळे,संजीव राठोड,भागवत शिंदे,सचिन सीरसाट,पांडुरंग कदम,अंकुश शिंदे,मनोज अभंगे,रवी सूर्यवंशी,बाळासाहेब मुंडे,महेश देशमुख,सचिन बिराजदार,सोमनाथ कलशेट्टी,संग्राम रोडगे,अनिल पांढरे, कैलास धुळगुंडे,श्रीपाल बस्तापुरे, गोविंद चौहान,तानाजी गरड,अनिल जाधव,प्रदीप शेळके, अबू बकर,विकास सूर्यवंशी, गणेश उसनाळे,सदाशिव हडोळे,शिवराज चिंचोले, सोमलिंग पाटील, प्रशांत खडप,महादू मोहिते आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.