logo

लातूर दुष्काळ मानव निर्मित आणि राजनैतिक

*मागील सहा वर्षातील फरक.....*

रुक्षतेतून हिरवळीकडे – लातूरचा हरित प्रवास
एक काळ होता, जेव्हा लातूर म्हटलं की आठवायचं रेल्वेने आलेलं पाणी, कोरडी माती, रखरखतं उन्हं, आणि पाण्यासाठी रडकुंडीला आलेली माणसं. गावकऱ्यांच्या डोळ्यांत आशेऐवजी चिंता दिसायची. माळरानावर झाडं उगवण्याऐवजी, तिथं धूळ उडायची. *कुणी सांगितलं असतं, की काही वर्षांत हेच लातूर हिरवळीत न्हालेलं असेल – तर कदाचित कोणीही विश्वास ठेवला नसता.*

वारंवार येणारं हे दुष्काळाचं लोन कायमच घालवायचं यासाठी लातूरचे आमदार मा. श्री. अमित विलासराव देशमुख साहेबांनी ठरवलं – "बस्स! आता पुरे झालं, आता कायमचा या कोरड्या दुष्काळाचा बंदोबस्त करायचा आणि यावर तोडगा काढण्यासाठी बोलावली सर्वपक्षीय राजकीय मंडळी, सामाजिक संस्था आणि पर्यावरण तज्ञ या दुष्काळाचा कायमचा सामना करण्यासाठी उपाय योजना करणेसाठी चर्चा सुरु झाली बऱ्याच मंडळींनी वेगवेगळी कारणे सांगितली पण आपल्या लातूरची वृक्ष संपदा कमी असल्यामुळे पर्जन्यमान कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येऊन त्यावर उपाय योजना करण्याचा ठाम निश्चिय झाला....!" वृक्ष कोणती, कुठं किती अंतरावर, किती उंचीची लावायची चर्चा सुरु झाली आणि यातूनच *आजची आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा* जन्म झाला.

आजची आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या तरुण सदस्यांनी सहा-साडेसहावर्षांपूर्वी हातात झाडं घेतली, फावडं घेतलं आणि स्वप्न उरात घेतलं ते अजूनतरी खाली ठेवलेलं नाहीं. हे स्वप्न होतं – हिरव्या लातूरचं. कुणाला प्रसिद्धी हवी नव्हती, ना शाबासकी. हवी होती केवळ परिवर्तनाची तहान,

कधी सकाळी, कधी संध्याकाळी, कधी उन्हात, कधी पावसात तर कधी कडाक्याच्या थंडीत – ह्या तरुण सदस्यांची पावलं आजसुद्धा एक दिवसही थांबली नाहीत. लोकांनी सुरुवातीला प्रश्न विचारले, थट्टा केली, पण हळूहळू लातूरकरही जोडले गेले. हे काम केवळ झाडं लावण्याचं नव्हतं – हे एक चळवळ बनली. *उद्देश अतिशय निर्मळ आपलं लातूर हरीत, सुंदर आणि स्वच्छ करण्याचा.*

आज सहा साडेसहा वर्षांनी मागं वळून पाहिलं की, जिथं निसर्ग रुसलेला होता, तिथं आता तो हसतोय. तापमान नजिकच्या जिल्ह्या पेक्षा कमी झालंय, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची सळसळ, उन्हाची रखरख गेली व झाडांची सावली आली आणि तेवढीच शुद्ध हवा वाहिली – लातूरच्या नशिबात शीतलता आली आहे.

ही फक्त हरित क्रांती नव्हे, ही मानसिक क्रांती आहे. ही कहाणी आहे, आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशच्या तरुण सदस्यांच्या चिकाटीची, लोकसहभागाची, आणि आपल्या मातीत पुन्हा प्राण फुंकण्याच्या जिद्दीची.

आज सहा वर्षा पूर्वीचे लातूर पाहिलं आणि मनाला केलेल्या कष्टाचं चीझ झाल्याचं समाधान मिळालं.

*आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन*
🙏🏻🌳🤝🌳🙏🏻

6
249 views