logo

जनता दरबारातून होणार इंदिरा नगरच्या जमिनीच्या स्टेटस चा निर्णय

देवळी (वर्धा)

जनता दरबारातून होणार इंदिरानगरच्या जमिनीच्या स्टेटसचा निर्णय

आज इंदिरानगर मधील सर्वे नंबर 961 मध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून आमदार राजेश बकाने यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी आमदारांनी अशी प्रतिक्रिया दिली की 30 40 वर्षापासून तुम्ही संबंधित जागेवर राहत आहात आतापर्यंत किती नगरसेवक आमदार खासदार गेले मी 14 तास काम करतो पाच पंचवार्षिक रंजीत कांबळे यांना निवडून दिल तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकले मी तुम्हाला केव्हाही भेटतो तो तर भेटतही नाही मी तुमचे काम करून देतो पण वनविभागाची जागा असेल तर होणार नाही आपण जनता दरबार लावत आहोत त्यासाठी रिक्षा फिरवला जाईल संबंधित ठिकाणी मुख्याधिकारी एसडीओ बीडिओ इत्यादी अधिकारी उपस्थित असेल तेव्हा आपण या ठिकाणी आपली बाजू मांडावी असे आमदार साहेबांनी सांगितले त्यानंतर आमदार साहेबांनी दूरध्वनी वरून मुख्याधिकारी यांना संपर्क केला त्यावर त्यांनी विचारणा केली. मीरंगनाथ मंदिर मागील सर्वे नंबर 961 चे सातबारा वरील स्टेटस काय आहे? त्यावर मुख्याधिकारी यांनी कदाचित वनविभाग असे उत्तर दिले असावे नंतर आमदार साहेब म्हणाले की मी त्या जागेचा अभ्यास केला आहे 1965 मध्ये मध्य प्रदेशचे सीपी मेहरा सरकार होते त्यानंतर 1996 मध्ये सदर जागा अबादी जागा म्हणून संबोधले गेली 1996 नंतर 2002 किंवा 2004 मध्ये पुन्हा त्या जागेचे स्टेटस बदलले त्यानंतर पुन्हा 2023 मध्ये बदलले त्यामध्ये आपण sdo चे मत घेऊ की काय करता येते sdo नी सांगितले की सुरुवातीला स्टेटस जे आहे तेच पकडा मग सुरुवातीचा स्टेटस जे आहे ते आबादी जागा असे आहे त्यानंतर झुडपी झाले आहे ते आपल्याला शोधावे लागेल तुम्ही आज दुपारी आल्यानंतर मला कॉल करा आपण यामध्ये डोकं टाकून एकदा काय व्हायचे ते आपण फायनल डिसिजन पर्यंत जाऊ आणि सेवा पंधरवड्याचा विषय लावा कधी कॅम्प घ्यायचा ते मला सांगा. त्यानंतर आमदार साहेबांनी नागरिकांशी चर्चा केली त्यात त्यांनी म्हटले माझे सिओ मॅडम सोबत बोलणे झाले मी खोटे बोलणार नाही होत असेल तर हो म्हणेल नाहीतर नाही कलेक्टर सोबत बोलून त्या जागेचे स्टेटस बघावे लागेल मी पूर्ण या प्रकरणात लक्ष देऊन करून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सोबत राहावे मी तुमचा वकील आहे मला तुमची बाजू मांडावीच लागेल . नागरिकांची ही सर्व चर्चा करून आमदार बकाने यांनी लोकांच्या मनात आपली एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली. निवेदन देताना शंकर केवदे किरण बोंडणे विष्णू तडसे संतोष शिवरकर निलेश महाजन गजानन निकुरे दिनेश कावरे रवींद्र दुर्गुडे तसेच मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती व गावातील प्रतिष्ठित नागरिक व बीजेपी चे कार्यकर्ते पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती होती.

91
3472 views