logo

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असताना करडखेल पाटीजवळ एक मोटर सायकल व ट्रकचा अपघात होऊन मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. अपघात झाल्यानंतर १०८ क्रमांकावर ॲम्बुलन्ससाठी फोन केला मात्र अर्धा तास उलटूनही ॲम्बुलन्स आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करून
ॲम्बुलन्स लवकर पाठवण्यास सांगितले होते.

लातूर जिल्ह्यातील १०८ अंबुलन्स व्यवस्था संभाळणाऱ्या पीव्हीजी या कंत्राटदार कंपनीचे अधिकारी त्या घटनेच्या संदर्भाने आज बाभळगाव निवासस्थानी खुलासा करण्यासाठी आले होते. त्यांचा खुलासा पटण्यासारखा नव्हता. ॲम्बुलन्स व्यवस्थेसाठी शासनाचा प्रचंड पैसा खर्च होतो आहे. जनतेला सेवा मात्र वेळेत उपलब्ध होत नाही, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. २१ सप्टेंबर २०२५ रोजी उदगीर तालुक्यातील करडखेल येथे आणि त्यापूर्वी ५ जुलै २०२५ रोजी औसा तालुक्यात हरेगाव - जवळगा रस्त्यावर अपघात झाला होता तेव्हा... असे दोन वेळा ॲम्बुलन्स वेळेत पोहोचली नसल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. सामान्य माणसाच्या बाबतीत तर ही व्यवस्था किती तत्परता दाखवत असेल हा प्रश्नच आहे. एकंदरीत #रोड_सेफ्टी_असिस्टंन्स_प्रणाली खूपच अकार्यक्षम बनली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ॲम्बुलन्स सेवा देणाऱ्या #BVG कंपनीच्या कार्यक्षमतेची चौकशी करणे अत्यावश्यक बनले आहे. या संदर्भात आपण रीतसर तक्रार करणार असून लातूर जिल्हाधिकारी व संबंधित आरोग्य विभाग या तक्रारीची गंभीर दखल घेतील, आंदोलन सेवा देणाऱ्या कंपनीच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल पाठवला जाईल, तेथून ही व्यवस्था सुधारण्याचा दृष्टीने योग्य ती कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे.

0
12 views