
देवळाली प्रवरा शहराच्या इतिहासात पुन्हा एक मानाचा तुरा..!
देवळाली प्रवरा शहराच्या इतिहासात पुन्हा एक मानाचा तुरा..!
कु. आंचल तोडमल समाज कल्याण अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण..!
मुलींसाठी अद्यावत अभ्यासिका नसल्याची खंत - आंचल तोडमल
देवळाली प्रवरा - दि. २३ सप्टें. २५
देवळाली प्रवरा येथील उद्योजक अनिल तोडमल यांची सुकन्या आंचल हिने नुकतेच समाज कल्याण अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी ढूस परिवाराचे वतीने कु. आंचल व तिचे वडील अनिल तोडमल यांचे शाल तसेच महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात अल्पावधीत लोकप्रिय ठरत विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेले वैभव ढूस लिखित अंतः अस्ति प्रारंभ हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले. प्रसंगी बोलताना देवळाली प्रवरा येथे मुलींसाठी अद्यावत अभ्यासिका नसल्याची खंत आंचल तोडमल हिने बोलून दाखविली.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.
उद्योगात अपयश आल्यानंतर अत्यंत खडतर अशा परिस्थितीमधून देवळाली प्रवरा येथील अनिल तोडमल यांनी वाट काढत मुलींचे शिक्षण पार पाडले.. त्यामुळे खऱ्या अर्थाने अंतः अस्थि प्रारंभ पुस्तकांमधील प्रत्येक वाक्य त्यांच्यासाठी लागू पडते असे म्हटल्यास वागे ठरणार नाही.. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सर्व जळून गेल्यानंतर राखेतून जसा फिनिक्स पक्षी उड्डाण घेतो.. अगदी.. त्याचप्रमाणे तोडमल यांचे सर्व काही संपले आहे असे लोक म्हणत असताना अनिल तोडमल यांनी मुलांना घडविण्यात लक्ष केंद्रित केले.. व, आज रोजी समाज कल्याण विभागात राज्यातून जवळपास पन्नास हजार मुलांमधून समाज कल्याण अधिकारी या मोठ्या पदावर त्यांची मुलगी आंचल हिने परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.. तेव्हा कुठे अनिलरावांच्या जीवनाचे सार्थक झाले.. केवळ तोडमल कुटुंबासाठीच नव्हे तर समस्त देवळाली प्रवरा शहरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.. असे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
सत्काराला उत्तर देताना आंचल तोडमल हिने आत्तापर्यंत दिलेल्या परीक्षांचा अनुभव कथन करताना आई-वडिलांची साथ असल्याने माझ्यासाठी ही परीक्षा अवघड नव्हती असे म्हटले आहे. तसेच यापुढेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे काम सुरू असून यापेक्षाही उच्च पद मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आंचलने बोलून दाखवली.. त्याचबरोबर अभ्यासिकेची गैरसोय असल्याने मला थेट राहुरी फॅक्टरी येथे जाऊन अभ्यास करावा लागला म्हणून गावातील मुलींना अभ्यास करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी स्वतंत्र अभ्यासिका असणे गरजेचे असल्याची खंतही तिने बोलून दाखविली व अभिनंदन केल्याबद्दल ढूस परिवाराचे आभार व्यक्त केले.
प्रकाश वाकळे यांनी आभार व्यक्त केले..