कोपरखैरणेतील पहिली पायलट: खुशी म्हात्रेच्या यशाचे मनसेकडून अभिनंदन
नवी मुंबई: कोपरखैरणे गावची कन्या कु. खुशी शिल्पा प्रवीण म्हात्रे हिने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून कमर्शियल पायलटचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, ती आपल्या गावातून पायलट बनणारी पहिली महिला ठरली असून, तिच्या या यशामुळे नवी मुंबई शहर आणि आगरी कोळी समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे.
खुशीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष मा. श्री. गजानन काळे यांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तिच्या या कामगिरीमुळे परिसरातील अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी प्रसिद्धीसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा:
दत्तात्रय तुकाराम काळे
(सामाजिक मीडिया कार्यकर्ता, एआयएमए मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी)
मोबाईल: ८०८००७६२६२