logo

खासदार निलेश लंके यांच्या विषयी अपशब्द मजकूर सोशल मीडिया वर व्हायरल करण्यावर कायदेशीर कारवाई करावी;खाजदार निलेश लंके प्रतिष्ठान वतीने निवेदन

* खासदार निलेश लंके यांच्या विषयी अपशब्द मजकूर सोशल मीडिया वर व्हायरल करण्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी पोलिस निरीक्षक शेवगांव याना खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले*
निवेदनात असे म्हंटले की, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री. निलेश लंके यांच्याबद्दल सोशल मीडियावर आबासाहेब बनवसे फेसबुक अकाउंट वरून अपशब्दयुक्त, अयोग्य व बदनामीकारक मजकूर तयार करून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला आहे. सदर कृत्य हे लोकप्रतिनिधींचा अपमान करून त्यांच्या मानहानीस कारणीभूत ठरत असून, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारे आहे. म्हणून, आपणास विनंती आहे की :सदर प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधित दोषींवर भारतीय दंड संहिता (BNS) व माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा.दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालावा.भविष्यात अशा प्रकारचे मजकूर व्हायरल होऊ नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
निवेदन देते वेळी प्रदीप गरड,कारवाई करण्या बाबत निवेदन देताना शेवगाव तालुका आदरणीय खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी राहुल वरे, विश्वास घुटे सर, सोमनाथ भाऊ मोहिते, भागवत भाऊ शिंदे, छबुदादा मंडलिक, प्रदीप गरड, पोषण्णा कडमिंचे, बंडू काका रासने, वजीर भाई पठाण, सरपंच शंकर काटे, मोहसीन सय्यद,सुरेश लांडे, दिलीप सुपारे, गणेश साळवे, गणेश शहाणे, सुनील आहुजा, मुन्ना लाकडे, संपत भाऊ इसरवाडे, तात्यासाहेब घोरपडे, तात्यासाहेब डाके, बाळू भारस्कर, सिमोन घाडगे, व आदरणीय खासदार नीलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते व इतर कार्यकर्ते, उपस्थित होते.पोलिस निरीक्षक PI मुटकुळे साहेब यांनी सदर व्यक्ति वर लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले.

49
3200 views