
धनगर ST आरक्षण अंमलबजावणी साठी जालन्यात उसळला धनगरांचा रेकॉर्ड ब्रेक धडकी भरवणारा मोर्चा.
धनगर ST आरक्षण अंमलबजावणी साठी जालन्यात उसळला धनगरांचा रेकॉर्ड ब्रेक मेळावा.
धनगर समाजाच्या ST शेडूल्ड ट्राइब चे आरक्षण संविधानामध्ये 36 नंबरला नोंदणी कृत आहे. त्यात धनगड आणि धनगर ही एकाच शब्दाची उच्चारानुसार दोन रूपे तयार करून आजवर या समाजाची फसवणूक होत आली आहे.
या अगोदर सुद्धा अनेक उपोषण झाले पण कोणी लक्ष घातले नाही.
परंतु सध्या जालना जिल्ह्याच्या ठिकाणी दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आयोजित मेळाव्यास लाखोच्या संख्येने धनगर समाज जालन्यात एकत्र आला. त्यामुळे सरकारला यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या अगोदर 2014 साली बारामती मधे धनगर समाजाचे उपोषण सुरू होते. तिथे जाऊन भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला पाठिंबा द्या. आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत तुमचा प्रश्न सोडवतो. अशी हमी दिली होती . परंतु त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस तीनदा मुख्यमंत्री झाले परंतु अजून त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून कालच्या मेळाव्यात दीपक बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री पदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना समाजाची माफी मागावी अथवा आपला शब्द खरा करा. असे विनंती पूर्वक सांगितले आहे. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे बघणे महत्त्वाचे आहे.