
जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री देविदास महाजन यांना "सेवा जेष्ठता यादीची पडताळणी" बाबत निवेदन सादर करण्यात आले,
ठाणे - २५ सप्टेंबर २०२५ रोजी ठाणे जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री देविदास महाजन यांना "सेवा जेष्ठता यादीची पडताळणी" बाबत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये जिल्ह्यातील खाजगी, अंशतः अनुदानित तसेच अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांसाठी होणाऱ्या पदपूर्तीत सेवा जेष्ठतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी करण्यात आली. काही शाळांमध्ये सेवा जेष्ठतेची यादी नियमांनुसार तयार केली असली तरी, काही ठिकाणी संस्थेच्या स्वारस्यानुसार अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले असून, त्याचा शिक्षकांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
ही मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ठाणे, श्री प्रमोद वाघमोडे, ठाणे मनपा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री रणजीत शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते व क्रीडा शिक्षक श्री जीवन जाधव यांच्या संयुक्त उपस्थितीत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सन्माननीय राज्य अध्यक्ष श्री शरदचंद्र धारूरकर व सचिव श्री चांगदेव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुंबई विभाग सचिव श्री अंकुर आहेर व ठाणे जिल्हा संघटना सचिव श्री गणेश मोरे व खजिनदार श्री दौलत चव्हाण यांच्या सहकार्याने करण्यात आले.