logo

वैष्णवी चौकातील सामाजिक व धार्मिक उपक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर -पो.नि. संजय ठेंगे...

वैष्णवी चौकातील सामाजिक व धार्मिक उपक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर -पो.नि. संजय ठेंगे

राहुरी फॅक्टरी
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून समाजात एकात्मता, धार्मिकता व सामाजिक भान निर्माण करून खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर घडविला असल्याचे प्रतिपादन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.

राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नवरात्र महोत्सवनिमित्त भगिनाथ बाबा राहिंज निर्मित व कृष्णा व भूषण राहिंज प्रस्तुत 'गजर मल्हारीचा, नाद भंडाऱ्याचा' या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक ठेंगे म्हणाले को, समाजात महिलांवर अत्याचार, छेडछाड, अपहरणाच्या घटना घडताना दिसतात, हे आपल्या सर्वांसाठी चिंतेचे कारण आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना चांगले संस्कार व शिक्षण देऊन आत्मरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे हाच खऱ्या अर्थाने हा नवरात्रीचा संकल्प होईल असे ते म्हणाले.


यावेळी कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कृष्णा राहिंज व भूषण राहिंज यांनी आपल्या सुरेल आवाजात भक्तिगीते तसेच इतर गाण्यांची अप्रतिम मैफल सादर केली. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती, भक्तिगीताने करण्यात आली. खंडोबा, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतावर गाण्यावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृष्णा व भूषण राहिंज यांची गीतरचना असलेल्या चिमणी माझी उडून गेली या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्यने भाविक भक्तगण उपस्थित होते.

69
2162 views