
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुक करुन सुमारे एक वर्षापासुन दोन वेगवेगळया गुन्हयातील फरार आरोपींला शेवगाव पोसलीसांनी केली अटक
शेवगांव:शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे- डी. के. ट्रेडींग अॅण्ड इनव्हेस्टमेंट नावाचे शेअर मार्केट ऑफीस केसभट वस्ती शेवगाव येथे राहत्या घरी चालु करुन फिर्यादी व साक्षिदार यांचा विश्वास संपादन करुन शेअर मार्केट च्या नावाखाली एकुण- 27,50,000/- (सत्ताविस लाख पन्नास हजार रुपये) फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 334/2025 भादवि कलम 420,409,406 प्रमाणे दिनांक-14/04/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नामे दिलीप भिमराज केसभट रा. केसभटवस्ती ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा सुमा. गुन्हा केल्यापासुन एक वर्षापासुन फरार झाला होता.
मा. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नेम शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे दिलीप भिमराज केसभट यांची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करुन त्यांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी दिलीप भिमराज केसभट हा केडगाव चौफुला येथुन पोलीस पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या गुन्हयातील फिर्यादी नामे संभाजी भिमराज गाडेकर रा. माळेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर
यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडींग कंपनी नामे ए. ट्रेडींग इन्व्हेस्टर नावाचे शेअर मार्केट ऑफिस कुरुडगाव ता. शेवगाव येथे चालु करुन फिर्यादी व साक्षिदार यांचा विश्वास संपादन करुन शेअर मार्केट च्या नावाखाली एकुण 1,20,64,000/-रुपयाची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.95/2025 भा.द.वि. कलम 420,409,406 प्रमाणे दि. 03/02/2025 रोजी दाखल करण्यात आला होता. आरोपी नामे - सुनिल रावसाहेब कवडे रा. रावतळेकुरुडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा सुमा. गुन्हा केल्यापासुन एक वर्षेपासुन फरार झाला होता.
मा. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नेम शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सुनिल रावसाहेब कवडे यांची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करुन त्यांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी सुनिल रावसाहेब कवडे रा. रावतळेकुरुडगाव ता. शेवगाव हा खरवडी कासार ता. पाथर्डी येथे नातेवाईकाकडे येणार असल्याची गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने त्यास खरवडी फाटा येथे असतांना पोलीस पथकांची चाहुल लागताच पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना शिताफिने पाठलाग करुन ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबमें सो अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री संतोष मुटकुळे सो. पोसई बाजीराव सानप, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, पोकों सचिन पिरगळ, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ भगवान सानप, पोकों ईश्वर बेरड, पोकों राहुल आठरे पोकॉ प्रशांत आंधळे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु तसेच सायबर मोवाईल सेल चे पोकों नितीन शिंदे यांनी केली असुन वरील दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे करत आहेत.