वृक्षारोपण व विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत चे नागपूर विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर व साकोली शहर संघटिका सौ.लता राजेंद्रकुमार चांदेवार यांचा वाढदिवस 25/09/ 2025 ला जि.प.प्राथमिक शाळा सालई/बु.येथे विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. येथिल सर्व विद्यार्थ्यांना नोटबूक ,पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शालेय पटांगणावर वृक्षारोपण करण्यात आले.सोबतच लता चांदेवार यांना आयकार्ड देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नागपुर विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर भंडारा, जिल्हाध्यक्ष भंडारा प्रा.खेमराज राऊत,जिल्हा युवा संघटक अनिल किरणापूरे , संजीवनी गजभिये सरपंचा सालई/बु.,नेफडो साकोली तालुका महिला अध्यक्षा कल्पना सांगोडे ,शहर महिला उपाध्यक्ष गीता बोरकर,संघटक लता चांदेवार ,तालुका सचिव विलास करंजेकर ,येल्ले सर, अंगणवाडी कार्यकर्त्या अरुणा तुळशीकर,चंदा गजभिये , शशिकला पुस्तोडे ,सायत्राबाई मसराम , इतर पदाधिकारी व गावकरी यावेळी उपस्थित होते.