logo

पुणे – बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या समावेत स्वच्छता रॅली चे आयोजन

पुणे
प्रतिनिधी श्री सुदाम येवले
नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक आरोग्य कोठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने "स्वच्छता ही सेवा १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पंधरवडा स्वच्छोत्सव" या अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम साहेब, परिमंडळ कार्यालय क्रं. ०२ चे उपायुक्त संतोष वारुळे साहेब, महापालिका साहाय्यक आयुक्त विजय नायकल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बावधन बुद्रुक गावामध्ये कै चेतन दत्ताजी गायकवाड शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांच्या साहाय्याने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच जनवानी संस्था जनसुविधा सोशल फाउंडेशन यांच्या सभासदांमार्फत पथनाट्य सादर करून सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक बंदी, कचरा विलगीकरण संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी मा नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील, बावधन नवरात्र उत्सव समितीचे सभासद मा. उपसरपंच बावधन ग्रामपंचायत श्री तानाजी दगडे, ग्रामस्थ तसेच मा सहाय्यक आयुक्त श्री विजय नायकल साहेब आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री हनुमंत चाकणकर, श्री लक्ष्मण कुलकर्णी, करण कुंभार, श्री दत्तात्रय दळवी, श्री राजेश आहेर, श्री गणेश चोंधे, श्री प्रमोद चव्हाण ,सूरज पवार ,मोकादम श्री राम गायकवाड ,श्री साईनाथ तेलंगी श्री बापू वाघमारे ,स्थानिक नागरिक बाळनाथ भुंडे ,अशोक भुंडे,नथू दगडे,राजेंद्र दगडे ,भिवाजी जाधव तसेच सर्व सफाई कर्मचारी, जनवाणी सेवा संस्था, स्वच्छ सहकारी संस्था , जनसुविधा सोशल फाउंडेशन संस्था यांचे सभासद उपस्थित होते.

11
1827 views