logo

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजावर मोठं आर्थिक व मानसिक संकट ओढावलंय, त्यांचा संसार पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अशा स्थितीत बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचवण्यासाठी नेत्यांनी राज्यभरातील ‘नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा’ सुरु केला आहे. या माध्यमातून सर्व बाधित ठिकाणांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जातोय.

विधिमंडळ पक्षनेते व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी माननीय श्री. हर्षवर्धन पाटील यांनी आज स्थानिक खासदार माननीय श्री. धैर्यशील मोहिते- पाटील, स्थानिक आमदार माननीय श्री. अभिजित पाटील, स्थानिक आमदार माननीय श्री. नारायण पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा व इतरही नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली आणि बळीराजाला मानसिक आधार दिला.

1
0 views