logo

वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्त्यांची प्रेरणादायी बेरिस्ते केंद्र सहलनवी

वनवासी कल्याण आश्रम नवी मुंबई व ठाणेतील कार्यकर्त्यांची दोन दिवसीय अभ्यास सहल २० व २१ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते केंद्र येथे पार पडली. या सहलीत छात्रावास, चिकित्सा, संस्कारवर्ग या महत्त्वपूर्ण आयामांचा प्रत्यक्ष अनुभव कार्यकर्त्यांना घेता आला.सहल पनवेलहून सुरू होताना देवबंध येथील सेवाकेंद्र व गणपती मंदिरास भेट देऊन तेथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुपारी बेरिस्ते केंद्रावर आगमन झाल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमा पाटोळे व प्रांत चिकित्सा आयाम प्रमुख श्री. विकासजी चितळे यांनी केंद्राची माहिती दिली. संध्याकाळी झालेली भजन संध्या व समाजजागृती संदर्भातील मार्गदर्शनाने वातावरण भारावले.दुसऱ्या दिवशी सकाळीच ५६ विद्यार्थ्यांच्या सहभागासह संस्कारवर्गाचा शुभारंभ झाला. प्रार्थना, गाणी, शैक्षणिक उपक्रम आणि सकस नाश्ता अशा उपक्रमांमुळे मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या सोबतच जनजाती समाजातील परंपरा, संस्कार, समस्या व त्यावर होणारे प्रयत्न यांचा कार्यकर्त्यांना जवळून परिचय झाला.अखेरच्या टप्प्यात विक्रमगड तालुक्यातील महाविद्यालयीन छात्रावासास सदिच्छा भेट देऊन अभ्यास सहलीची सांगता झाली.या सहलीतून वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा व्याप, कार्यकर्त्यांचा समर्पणभाव व समाजासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा प्रभावी परिचय मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
https://youtu.be/OiygyreLBN4?si=D1J2GDprE9pA3BX4

14
556 views