logo

पुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड 36 वा वार्षिक अहवाल एकतर्फी ठराव मंजूर

ठराव एकमताने मंजूर; नवीन सभासदांचा सत्कार व गुणवंतांचा गौरव
आळंदी, ता. खेड (जि. पुणे) – पुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता फुलवाला धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, आळंदी देवाची येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष मा. निखिल नारायण शेठ भोईटे सभासदांना भेट होते.
सभेत मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहून सोसायटीच्या कामकाजाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला सचिवांनी मागील सभा (दि. 25 ऑगस्ट 2024) मधील ठराव व वित्तवंत वाचून दाखवले. ते एकमताने मंजूर करण्यात आले.
यानंतर संचालक मंडळाच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रिका सादर करण्यात आली. उपस्थित सभासदांनी यावर चर्चा करून ते मंजूर केले. याच बैठकीत 3 जून 2025 रोजी झालेल्या सभेत नफा विभागणीबाबत घेतलेला निर्णय देखील सभासदांनी एकमताने मंजूर केला.
तसेच वैदिक लेखा परीक्षकांचा 2024-25 आर्थिक वर्षाचा अहवाल व 2023-24 आर्थिक वर्षाच्या दुरुस्ती अहवालास मंजुरी देण्यात आली. येत्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2025-26 साठी अंतर्गत व वैयक्तिक यांची ले हिशोब तपासणी ची नेमणूक करून लेखापरीक्षण देण्यात येणाऱ्या मानधनास देखील मंजुरी मिळाली. पुढे 2025-26 चे अंदाजपत्रक सभासदांच्या मंजुरीने पारित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 75(2) नुसार संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती पारदर्शकतेने सभासदांना देण्यात आली.
सभेच्या शेवटी अध्यक्ष मा. निखिल शेठ भोईटे यांनी सर्व सभासदांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सोसायटीच्या प्रगतीत सभासदांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगून, पुढील काळात सोसायटीने अधिकाधिक समाजोपयोगी योजना राबवाव्यात असे मत व्यक्त केले.
सभेच्या शेवटी एक वेगळा उपक्रम म्हणून नवीन संचालिका सौ शैला नंदाराम गोडसे सौ अश्विनी संभाजी लोणारी.सत्कार करण्यात आला. तसेच सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्यामुळे सभेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. सभासद वतीने एकतर्फी मान्य करण्यात आला तानाजी जगताप संजय घुंडरे विलास ठाकूर माऊली गोडसे बाळासाहेब चौधरी मोहन शेठ जगताप बाबा ठाकूर एडवोकेट काशीद सर राहुल नंदराम गोडसे गावडे सर बाळासाहेब चौधरी पांडुरंग कुऱ्हाडे माऊली दिघे रमेश शेठ दिघे संजय वडगावकर सर्व सभासदांनी ठराव मान्य केला राष्ट्री गीताने सांगता झाली

0
70 views