मुस्लिम सेवा संघाकडून ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचा सत्कार
रिसोड : प्रतिनिधि. शेख शहेज़ाद
रिसोड शहराचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विपरीत घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. शहर व तालुक्यातील मोठ्या चोरीच्या तसेच विविध गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी यश मिळवत जबाबदार अधिकारी म्हणून आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या प्रतिमेत वाढ झाली असून, त्यांच्या कार्याविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र मुस्लिम सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फयाज अहमद (प्रदेश उपाध्यक्ष, मुस्लिम सेवा संघ), सत्तार भारती, फतरुभाई, शेख नदीम परवेज व ईश्तेक खान आदी मान्यवर उपस्थित होते.