logo

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रिसोड तहसीलवर मोर्चा – ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

रिसोड प्रतिनिधी शेख शहजाद

तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके उध्वस्त झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे रिसोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत, कर्जमाफी व पीकविम्याचे दावे तातडीने निकाली काढावेत अशी मागणीही करण्यात आली.

तहसीलदारांना निवेदन सादर करत, शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

📌 प्रमुख मागण्या

ओला दुष्काळ जाहीर करावा

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी

कर्जमाफीची अंमलबजावणी करावी

पीकविमा दावे त्वरित निकाली काढाव


277
477 views