logo

कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन दुर्गादेवी भजनी मंडळ नाशिक यांच्या भगिनींनी सन्मानित करण्यात आले

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र तर्फे दुर्गादेवी सन्मान सोहळा संपन्न,
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी, म्हसरूळ येथे दुर्गादेवी भजनी मंडळातील तब्बल 25 महिलांचा गुलाब पुष्प आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच दुर्गादेवी भजनी मंडळाकडून देखील कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी सर यांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दुर्गादेवी भजनी मंडळाच्या संचालिका आणि अध्यक्षा सुचेता देवरे मॅडम, सीमा कुलकर्णी, मंगला अगस्ते, वैजयंती पुराणिक, सुगंधा शुक्ल, वैशाली शुक्ल माधवी अगस्ते, रेखा अगस्ते, अनिता बोरसे, अनिता ओझरकर, जयश्री आहेर, वंदना वाघ, कल्याणी देशपांडे, कल्पना बोराडे, क्षमा भसे,चित्रा देव, पुष्पा खैरनार, सुप्रिया गुंडे, सुरेखा दीक्षित ,नेहा कुलकर्णी, शुभांगी शिंदे, कविता हिंगे, प्रमिला चांदवडकर आदींचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यावेळी सर्वांनी भजन आणि वाद्यांच्या तालावर ठेके धरले आणि नृत्याचा आनंद घेतला.
त्याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सुनील परदेशी सर, राजेंद्र आहेर, आरती ताई आहिरे, ॲड सौ कामिनी भानुवंशे,अलकनंदा जोशी, प्रिया कुंभार, स्नेहा शिंपी आदी उपस्थित होते.
श्री व सौ सिमा कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आदरतिथ्य केले व आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना यामध्ये सहभागी करून घेतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

82
2552 views