logo

बिझनेस बँक नाशिकरोड बॅकचे महिला संचालक व महिला अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र २०२५ विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्याचा मानस यंदाही संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्या मध्ये संस्थेच्या पदाधिकारी व प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून सौ. निकिता पवार मॅडम यांनी पुढाकार घेतला व बिझनेस को ऑफ बॅक लि. नाशिकरोडचे डायरेक्टर मंडळच्या सौ. आशा रामेश्वर जाजु सौ. अंजली आशुतोष राठोड, सौ. राजश्री राजेंद्र कोपते व बॅकेच्या मॅनेजर सौ. स्वाती पंकज जाधव यांच्या सहकार्याने बॅकेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी, महिला संघटक मंत्री सौ आरतीताई आहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ह्या कार्यक्रम मध्ये संस्थेच्या वतीने आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल माहिती देण्यात आली तसेच बॅक कडून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले सेंव्हीग कशी होईल त्याकडे लक्ष दिले पाहिजे आदी माहिती दिली तसेच कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने बिझनेस बँकेला केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने सुनिल परदेशी, आरती ताई आहिरे, सिमा पंडित, आशा भालेराव, ॲड. दिप्ती गवळी मॅडम, रुपाली तांबारे, सोनी सोनसळे, अश्विनी पोरजे, छाया चौधरी, निकिता पवार मॅडम , मिलींद दोंदे आदी उपस्थित होते

67
1237 views