logo

हिंदू बाल मित्र मंडळ ढोलेवाडी यांच्याकडून सप्तशृंगी माता सातवी माळ निमित्त आरती खिचडी प्रसाद वाटप

ढोलेवाडी संगमनेर
अहमदनगर

हिंदू बाल मित्र ढोलेवाडी राजापूर रोड यांच्यातर्फे जय बजरंग तरुण मित्र मंडळाची सातवी माळ चे स्वागत व त्यांच्या हस्ते आरती अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या कडून सन्मान करून स्वागत .

जय बजरंग तरुण मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सप्तशृंगी देवीची माळ ही चाळीस वर्षापासून घेऊन जातात व त्याचे अध्यक्ष व सदस्य काही अडचण आल्या तरी माळीचा खंडन न करता ही परंपरा 40 वर्षापासून करत आहे आणि यापुढेही करणार आहे असे जय बजरंग तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी सांगितले आहे यापुढेही ही परंपरा अशीच चालू राहणार आहे .त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी बोलले आहे

जय बजरंग तरुण मित्र मंडळाचे धडाडी कार्यकर्ते नवरात्री उत्सव मध्ये लहान पासून मोठ्यापर्यंत माळीचा आनंद घेतात व ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीचा उत्कृष्ट नियोजन करतात . नवरात्र उत्सव एकत्र येऊन रोज आरती व खिचडी प्रसाद वाटून माळी च नियोजन व्यवस्थित करतात हा आनंद पाहण्यासारखा असतो . आम्ही ही तो आनंद लहानपणापासून आतापर्यंत घेत आलो आहे आणि यापुढेही घेणार आहेत. ग्रामस्थ ही या देवीची माळ मध्ये उपस्थित राहून शोभा वाढवतात .
जय बजरंग तरुण मित्र मंडळाची सातवी माळ ही हिंदू बाल मित्र मंडळ यांनी स्वागत करून त्यांना आरतीचा मान दिला व ते ही आरती ला उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल हिंदू बाल मित्र मंडळ यांनी त्यांचे आभार व सत्कार केला. आरती नंतर खिचडी प्रसाद चा आनंद घेतला.
हिंदू बाल मित्र मंडळ ढोलेवाडी यांनी सातवी माळी निमित्त आरती व खिचडी प्रसाद वाटप करण्यात आली . यामध्ये सर्व उपस्थित राहून आरतीचा व खिचडी प्रसादाचा लाभ घेतला त्याबद्दल हिंदू बालमित्र मंडळ यांच्याकडून आनंद आभार करण्यात आला .


180
4817 views