logo

शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; कोट्यवधींचे पीक जमिनदोस्त...

(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने, कळगाव, कुंभारे परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पपई, केळी, मका, कापूस मिरची यासह आदी पिके जमिनदोस्त झाली.
शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शासनाने तात्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकावर कोंब फुटल्याने पीक घरात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. कपाशीचे बोंड, पात्या, फुले उन्मळून खाली पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना तडा गेला आहे….

33
781 views