
अनुदानित आश्रम शाळा सामोरे ओळख ज्ञानेश्वराची अंतर्गत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे
*अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे ओळख ज्ञानेश्वरी ची अंतर्गत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे*
पिंपळनेर : महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संचलित अनुदानित आश्रमशाळा सामोडे,वि.जा.भ.ज.आश्रमशाळा पिंपळनेर,दाजी साठे इंग्लिश मेडीयम स्कूल पिंपळनेर,अटल फार्मसी कॉलेज पिंपळनेर या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना *ओळख ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ची* हा शाळेय मुलांसाठी मुल्य शिक्षण विषयक उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार आळंदी यांच्या वतीने हरिनाम गजरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था पिंपळनेर च्या अध्यक्षा पुष्पलता पगारे, सचिव स्वप्निल पगारे, उपाध्यक्ष छायाताई पगारे, संचालक विजयराव सोनवणे, संचालक व्ही. एन. जिरे पाटील, संचालिका इंद्रायणी वरंदळ, संचालिका हर्षायनी सोनवणे, संचालक मिलिंद महाजन यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पलता पगारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार चे आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर विश्वस्त व पत्रकार संघ अध्यक्ष अर्जून मेदनकर, ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज हिंगणकर, ह.भ.प. विश्वकर्मा महाराज पांचाळ, ह.भ.प. प्रल्हाद महाराज भुईभार, समन्वयक रेखाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे प्रमुख आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनात परिवाराचे वतीने धुळे जिल्ह्यातील पाच शाळांत उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे. कार्यक्रमाचे सुरुवातीला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संस्थेचे संस्थापक स्वर्गीय ॲड. संभाजी पगारे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज यांची लक्षणीय प्रतिमा संस्थेस भेट देत श्रींचे प्रतिमा पूजन झाले. ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमात विद्यार्थ्यांना सु -संस्काराची पेरणी व अध्यात्माचे धडे गिरवण्यात आले. विश्वकर्मा महाराज पांचाळ, प्रल्हाद महाराज भुईभार यांनी मार्गदर्शन केले. संस्कारशिल विद्यार्थी घडविण्यासाठी आपला श्री ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ किती महत्वाचा आहे हे सांगितले.या उपक्रमासाठी खास ओळख श्री ज्ञानेश्वरीची पुस्तिका तयार करण्यात आली असून या मार्गदर्शक पुस्तिकेचे दर आठवड्यातून किमान एक पाठ इयत्ता आठवीचे मुलासाठी घेण्याचे आवाहन करण्यात आहे. ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी शास्र आणि शस्त्र दोन्ही चे ज्ञान देणारी ती ज्ञानेश्वरी म्हणून सांगितले. तर संस्थेच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पलता पगारे यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचे मुळ आहे. म्हणून मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेस शाळेतील प्राचार्य मनेष माळी, मुख्याध्यापक एस.बी.मोरे, माजी मुख्याध्यापक उमेश माळी, मुख्याध्यापक योगेश्वर वेंदे यांच्या सह शाळेतील सर्व कर्मचारी प्रयत्नशील होते. विद्यार्थ्यांना हरिपाठ तसेच संस्थेस संत साहित्य सार्थ हरिपाठ व ज्ञानेश्वरी पारायण प्रति, सार्थ हरिपाठ, हरीपाठाच्या प्रतींचे वाटप हरिनाम गजरात करण्यात आले. सदर उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची ओळख श्री ज्ञानेश्वरी या संस्कारक्षम पुस्तिकेवर आधारित वार्षिक परिक्षा घेण्यात येणार आहे. या नंतर गुणवंत मुलांना बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण पगारे यांनी केले. पसायदान कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.