
चिखली (मैना ) येथे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना कामगंध सापळे व पिवळे सापळे वाटप.....!
काटोल प्रतिनिधी - नागपूर ग्रामीण
काटोल तालुक्यातील चिखली (मैना) हे गाव रिजनरेटिव्ह कॉटन प्रोजेक्टसाठी समाविष्ट असून, या प्रोजेक्टच्या माध्यमातून सेंद्रिय शेती व कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य दरवर्षी वितरित केले जाते. ॲग्रीजेनिक फार्मर प्रोडूसर कंपनी काटोल यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते. आज सोमवार दिनांक 29- सप्टेंबर 2025 ला चिखली (मैना ) येथे कामगंध सापळे व चिकट सापळे, ट्रॅप (किडनियंत्रक ) साहित्य शेतकऱ्यांना वितरित करून त्याविषयी सर्व माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ॲग्री जेनिक कंपनी कडून प्रफुल सर,रोहित सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शेतकरी बाबारावजी गोंडाणे, गणपतजी दुपारे, ज्ञानदेव जी दुपारे, ज्ञानेश्वर काळे, सुधाकर जी गावंडे, मनोहर सोमकुवर, उत्तम गोंडाने, रामभाऊ दुपारे, पंजाब डफरे, तसेच प्रगतशील शेतकरी तुषारजी ठाकरे, अनिल काळे,अतुलजी गावंडे, साहिल चौधरी, प्रफुल नारनवरे, राजेंद्र पाटील, रमेश दुपारे, सुनील डफरे व गावातील इतर शेतकरी उपस्तित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन A.V. फाउंडेशन चे संचालक विकास सोमकुवर यांनी केले.