बोरपाडा ता. अलिबाग येथे गरबा महोत्सव साजरा
अलिबाग प्रतिनिधी :- २८ सप्टेंबर रोजी देवा फाऊंडेशनचे सचिव आणि AIMA चे जिल्हा प्रतिनिधी श्री.विश्वनाथ भगत यांच्या बोरपाडा गावी ता. अलिबाग येथे नवरात्र उत्सवात भव्य व दिव्य गरबा महोत्सव पार पडला. या विशेष कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे ‘ गावातील सर्व मुलांनी केलेली वेशभूषा ’ या वेशभूषेत गावातील सर्व लहान थोरानी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्यावेळी आयोजकांकडून कार्यक्रमात विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
तसेच श्री विश्वनाथ भगत यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 प्राप्त झाल्यामुळे त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.