logo

एस बी एन एम काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतीक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा



धाराशिव :- (विकास वाघ धाराशिव) व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या दिनाची थीम “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” ही होती. या थीमनुसार फार्मसी व्यवसायाचे महत्त्व, समाजाप्रती फार्मासिस्टची भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी जागृती घडविण्यासाठी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले.

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना फार्मसी व्यवसायाचा आरोग्य व्यवस्थेतला महत्त्वाचा सहभाग, औषधनिर्मिती ते रुग्णापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत फार्मासिस्टची भूमिका, तसेच सुरक्षित औषधोपचार यांचे महत्त्व समजावून सांगितले.याशिवाय, विद्यार्थ्यांनी गटचर्चा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना “फार्मासिस्ट केवळ औषध विक्रेता नसून एक आरोग्य मार्गदर्शक आहे” हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. या शिवाय विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करत त्यांचे औषधनिर्माण शास्त्र मधील त्यांच्या अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. ननवरे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्ट हा केवळ औषध पुरवठा करणारा व्यक्ती राहिलेला नसून, तो रुग्णांना योग्य औषधोपचार, योग्य सल्ला आणि जीवनशैलीविषयी जागृती करून देणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरला आहे. ‘थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट’ ही संकल्पना समाजाला आरोग्य जपण्यासाठी फार्मासिस्टची गरज पटवून दिली.प्रा. केदार व प्रा.धस यांनी आपल्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवण्यासाठी विविध पैलूंवर संवादसाधला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सहा.प्रा. नागरगोजे,प्रा .हाके, प्रा. शेरखाने ,प्रा. किरदत्त , प्रा.जोशी, प्रा.माने,प्रा.हजारे, प्रा.पवार, प्रा. कुऱ्हाडे , प्रा.पठाण ,प्रा.मुंढे,प्रा. सांगडे,प्रा.जाधव व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0
0 views