logo

अतिवृष्टी-पूरामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र


अतिवृष्टी-पूरामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – राज्यातील जून ते सप्टेंबर 2025 या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर अतिरिक्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची माहिती खालीलप्रमाणे:

पिक प्रकार 20 मार्च 2014 ,27 मार्च 2023
1 जानेवारी 2024, 30 मे 2025

जिरायत शेती 2 हेक्टर – 10,000 रु 2 हेक्टर – 8,500 रु 3 हेक्टर – 13,600 रु 2 हेक्टर – 8,500 रु

बागायती शेती 2 हेक्टर – 15,000 रु 2 हेक्टर – 17,000 रु 3 हेक्टर – 27,000 रु 2 हेक्टर – 17,000 रु

बहुवार्षिक फळपिके 2 हेक्टर – 25,000 रु 2 हेक्टर – 22,500 रु 3 हेक्टर – 36,000 रु 2 हेक्टर – 22,500 रु


पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, मार्च 2014 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत शेतकऱ्यांना दिलेली मदत अनेकवेळा अपूर्ण राहिली आहे. खासकरून 30 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार खरीप 2025 पासून अतिवृष्टी-पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी अनुदान पूर्वीच्या प्रमाणाप्रमाणे (जिरायत शेती – 8,500 रु, बागायती शेती – 17,000 रु, बहुवार्षिक फळपिक – 22,500 रु) देण्याचा निर्णय घेण्यात आला, जो अपूर्ण असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
माजी आमदार पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर सरसकट अतिरिक्त मदत अनुदान स्वरूपात प्रदान करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य आर्थिक सहाय्य मिळू शकेल.
हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आले आहे.


0
0 views